Aurangabad LockedDown : आदेश मोडणाऱ्या २१ जणांविरुद्ध गुन्हे , बाहेर पडण्यापूर्वी कंट्रोलला फोन करून शंका दूर करा – उपायुक्त खाटमोडे

औरंगाबाद – देशभरात रविवारपासुन कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सुरु झालेल्या लाॅकडाऊन मुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.अशी माहिती पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली.
गेल्या दोन दिवसात शहरात ४०ठिकाणी नाकाबंदी लावून जमावबंदीचे आदेश मोडल्याचे २१ गुन्हे दाखल झाले आहेत.कोरोना व्हायरसमुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण जरी कमी होणार नसले तरी गुन्ह्याचे स्वरुप बदलतील. तरीही पोलिस प्रशासनाकडून जनते संदर्भातील सर्व जबाबदार्या पार पाडल्या जातील याची शहर पोलिस काळजी घेतील असा विश्वास खाटमोडे यांनी व्यक्त केला. आज २४ मार्च २०२० रोजी कोरोना वायरच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये संचारबंदी जमाव /बंदी लावण्यात आलेली आहे औरंगाबाद शहरातील मुख्य ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे नाकाबंदी व पेट्रोलियम च्या दरम्यान ज्या लोकांनी संचारबंदी जमावबंदीचे उल्लंघन केलेले आहे अशा लोकांच्या विरोधात औरंगाबाद शहर वाहतूक शाखेच्या वतीने १८८ आयपीसी खाली २१ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच शहरातील पोलिस स्टेशनच्या वतीने संचारबंदी जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून आज सहा केस १८८ आयपीसी प्रमाण दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शहर वाहतूक शाखेने ७९२ मोटार व्हेईकल ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे उद्या सुद्धा अशाच पद्धतीने आज पेक्षा जास्ती कडक अशी कारवाई उद्या केली जाणार आहे.
अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू ,वैद्यकीय सेवा ,अग्निशामक दल इतर आवश्यक सेवा या संचार बंदी/जमावबंदी मधून वगळण्यात आलेले आहे पण याव्यतिरिक्त जे नागरिक संचारबंदी/ जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कडक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे पण जनतेने घाबरून जाण्याचे काही कारण नाही कुणाला काही संशय येत असेल कुणाला काही ही खात्री करायची असेल कोणाला काही अडचण असेल तर पोलीस कंट्रोल रूम औरंगाबाद येथे संपर्क करावा किंवा पोलीस स्टेशनची फोनवर संपर्क करावा . किंवा कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याची फोनवर संपर्क करावा व खात्री करून घ्यावी पुन्हा एकदा सर्व नागरिकाला उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने /नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा!! व्हायरस च्या विरोधात लढाई जिंकायची असेल तर तुम्ही घरीच बसून ते लढाई जिंकू शकता रस्त्यावरील लढाईसाठी पोलीस दल सज्ज आहे. जे कोणी नागरिक संचारबंदी/ जमावबंदीचे उल्लंघन करतील आणि उल्लंघन करून रस्त्यावर येतील त्या लोकांविरुद्ध कडक स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे .. तरी आपण सर्वांनी मिळून संकल्प केला पाहिजे कि कोरोना व्हायरसला हरवायचा असेल तर फक्त आणि फक्त आपण घरात मध्येच बसून रस्त्यावर न उतरता आपण कोरोना व्हायरसला हरवू शकतो रस्त्यावरील लढाई लढायला पोलीस सज्ज आहे काळजी करण्याची गरज नाही . फक्त पोलिसांना घरांमध्ये राहून सहकार्य करावे गुढीपाडव्याच्या निमित्ताने पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना शुभेच्छा !!!