#CoronaVirusUpdate : कोरोनाच्या संशयावरून गरोदर महिलेला मारहाण

देशभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. यादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयातून एका तरुणाने गर्भवती महिलेला गळा आवळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही महिला ६ महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयावरुन या तरुणाने गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या साहाय्याने तिचा गळा आवळला. काही काळ महिला स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत राहिली. मात्र कालांतराने ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली.
या तरुणावर महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण फ्लोरिडा येथील आहे. २४ वर्षीय जॉन कॉरी या तरुणाला त्याच्या मजल्यावर राहणारी महिला कोरोनाबाधित असल्याचा संशय आला होता. त्यातून तरुणाने १७ मार्च रोजी महिलेसोबत दुर्व्यवहार केला. तत्सम महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. देशभरात कोरोनामुळे लोकांच्या मनात भीती आहे. त्यातूनही हा क्रुर प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.