निर्भया सामूहिक बलात्कार आणि निर्दयी खून प्रकरणाची अखेर !! बचावाचे अनेक प्रयत्न करूनही चारही नराधम फासावर लटकले ….

देशभर गाजलेल्या आणि निंदा झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील पिडितेला तिच्या मृत्यूनंतर सात वर्षांनंतर का होईना अखेर न्याय मिळाला असेच म्हणावे लागेल. कारण कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे २० मार्च २०२० ला सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधी अखेरच्या टप्प्यात या चारही दोषींच्या वकिलाने आपल्या अशिलांच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. दोषींनी रडारड करून आणि लादीवर लोळून बचावाचा प्रयत्न केला, तर काहींनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला पण या चौघांनाही अखेर ठल्याप्रमाणे सकाळी साडे पाचच्या सुमारास फासावर लटकवण्यात आले. पवन नावाच्या कसलेल्या , सराईत जल्लादाने या चौघांना फासावर लटकवण्याची कामगिरी यशस्वीरीत्या पार पडली.
विशेष म्हणजे जल्लाद असलेल्या पवन यांनी त्या चार दोषींना फासावर लटकवल्यानंतर त्यांना स्वतःलाही आनंद झाला. पण त्यांना वाटलेले समाधान हे केवळ क्रूर दोषींना फासावर लटकवल्याचे नव्हते, तर त्यांच्या मुलीच्या लग्नासंबंधी गोष्टीचेही होते. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार या चार दोषींना फाशी देऊन झाल्यावर या कामाचे जे मानधन म्हणून पैसे मिळणार आहेत, त्या पैशातून पवन हे आपल्या मुलीचे लग्न करणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता या चार दोषींनी फासावर लटकवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी पवन यांना खूप आनंद झाला होता. या कामाचे जे पैसे मिळतील त्यातून मी माझ्या नैतिक जबाबदाऱ्या पार पाडेन. माझ्या मुलींची लग्न आणि काही कर्जे फेडता येतील, अशी प्रतिक्रिया पवनने दिली होती.
पावन म्हणाला कि , “एकाच वेळी चार जणांना फाशी देण्याची माझी ही पहिलीच वेळ असणार आहे. त्या मोबदल्यात मला जे मानधन मिळेल त्या पैशातून मी माझ्या मुलीचं लग्न करून देईन” जल्लाद पवन यांच्या कुटुंबात पाच मुली आणि दोन मुले आहेत. त्यापैकी त्यांच्या चार मुलींचे विवाह झाले असून पाचव्या मुलीचे लग्न आता पवन लावून देणार आहे. त्याची एक मुलगी आणि दोन मुलांची लग्न अद्याप बाकी आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी दिल्यामुळे त्याला दोन लाख रुपये मिळाले आहेत.
कोण आहे पवन जल्लाद ?
उपलब्ध माहितीनुसार पवन यांच्या कुटुंबीयांच्या चार पिढ्या पासून ते गुन्हेगारांना फाशी देत आले आहेत. त्यांचे वडील मम्मी यांनी आतापर्यंत अनेक दोषींना फाशी दिली आहे तर आजोबा काळूराम यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे खुनी सतवंतसिंह सिंह आणि केहर सिंह यांना फाशी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी कुप्रसिद्ध रंगा आणि बिल्ला यांनाही फाशी दिलेली आहे पण पवन जल्लाद यांच्या हातून आतापर्यंत पर्यंत एकाही दोषीला फाशी दिलेली नव्हती. या निमित्ताने त्याने पहिल्यांदा चार दोषींना एकत्र फाशी दिली. पवन कुमार हे कांशीराम निवासी कॉलनीत राहतात. पवन कुमार अनेक दिवसापासून या चौघांच्या फाशीची तयारी करीत होता फाशी नसल्याच्या काळात त्याला पाच हजार रुपये दरमहा पगार मिळतो. हा पगार वाढवून २० हजार रुपये करण्यात यावा अशी पवन यांची मागणी आहे.