Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Effect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? मास्क आणण्यासाठी गेलेल्या महिलेचे घर फोडले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने खळबळ उडालेली असताना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरावर घरफोड्यांनी डल्ला मारून तिच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख ६ हजार असा ४६ हजारांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील इंद्रप्रस्थ सोसायटी मध्ये राहणारी महिला  मास्क आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेली होती. त्याच वेळी चोरटय़ांनी तिच्या घरात घुसून घरातील सोन्याची तीन वेढणी, एक सोन्याची अंगठी आणि रोख ६ हजार असा मिळून जवळपास ४६ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना संबधित महिला घरी आल्यावर, दरवाजा उघड असल्याचे दिसताच. त्यांनी घरात जाऊन पाहिल्यावर घरातील सर्व अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. आपल्या घरात चोरीची घटना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबधित महिलेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हडपसर पोलिसानी सांगितले. या प्रकरणातील चोरट्यांचा तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!