महानायक करिअर : विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी….चार महिन्याचे निःशुल्क स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशीम जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारासाठी बँक, रेल्वे, एल. आय. सी. इत्यादी लिपिकवर्गीय पदांसाठी चार महिन्याचे निःशुल्क स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी १९ मार्च २०२० पर्यंत आवेदनपत्र मागवले आहेत. स्पर्धा परिक्षेत होरपळुन निघणा-या गरिब व होतकरू विध्यार्थ्याना संजिवणी देणारा हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून सातत्याने सुरु असून, पूर्णपणे मोफत असलेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या विध्यार्थांकडून १९ मार्च पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या प्रशिक्षणासाठी २२ मार्च २०२० रोजी चाळणी परीक्षा होणार असून उत्तीर्ण उमेदवारांपैकी ३०% महिला ४% दिव्यांग ५% अनुसुचित जातीतील विशेष घटक व उर्वरित सर्वसाधारण ६१% अशी आरक्षणनिहाय ५०-५० विध्यार्थ्यांच्या तुकडी मध्ये एकूण १०० विद्यार्थ्यांची चार महिन्यासाठी निशुल्क प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांना ८०% हजेरी असल्यास ३ हजार रुपये प्रतिमहिना विद्यावेतन आणि ३ हजार रुपये किमतीचा पुस्तकांचा संच व इतर वाचन साहित्य मोफत दिल्या जाणार आहे, यासाठी प्रसंग करिअर अकेडमी, ढगे कॉम्प्लेक्स, योजना पार्क समोर,संस्कृती अपार्टमेंट जवळ,पंचायत समितीच्या पाठीमागे, सिव्हिल लाईन वाशीम येथे संपर्क साधावा. व आवेदनपत्र सादर करावे असे आव्हान वरील संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
संपर्क ७८४१०६२८१३ / ७९७२५०३४५२ / ७७७००६८७५५ / ९०७५४८१९४८