Air Strike : भारत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे “गुफ्तगु “

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पुलवामा येथे झालेल्या जैश ए मोहम्मदच्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. यासंबंधीची माहितीही त्यांनी बोल्टन यांना दिली. तसेच भारताने पाकिस्तानवर जी कारवाई अर्थात एअर स्ट्राईक केला त्याचीही माहिती अजित डोवाल यांनी बोल्टन यांना दिली.पाकिस्तानने भारताच्या हवाई हल्ल्यानंतर F16 या त्यांच्या लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्लाही भारतीय वायुदलाने परतवून लावला. या सगळ्या घडामोडींसंदर्भात अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सचिव जॉन बोल्टन यांना दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.