Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : मुलावर मित्रासह अनैसर्गिक अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

आपल्या ११ वर्षाच्या मुलावर वडिलांनीचअनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली असल्याचे वृत्त आहे. राजुरा शहरातील सोमनाथपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलगा पाचवीमध्ये शिकत आहे. मुलावर त्याच्या वडील व अन्य एका व्यक्तीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे मुलाच्या आईसमोरच  उघड झाले आहे. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून वडिलांसह इतर आरोपीला अटक केली आहे.

Advertisements

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , सोमनाथपूर वार्डात राहणाऱ्या या पीडित मुलाचे वडील मजुरी करतात. त्यांना दारू तथा अन्य व्यसन आहेत. याच नशेत त्यांनी मुलावर मित्रासह अनैसर्गिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार मुलाच्या आईने बघितला. त्यानंतर आई व मुलाने राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मुलाची वैद्यकीय तपासणी केली. त्यात मुलावर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. राजुरा पोलिसांनी वडिलांसह अन्य एका आरोपीवर पॉक्सो व कलम ३७७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात राजुरा शहरातील आणखी काही लोक सहभागी आहेत असा संशय आहे. त्याचा, तपास राजुरा ठाणेदार नरेंद्र कोसुरकर करत आहेत. पीडित मुलगा देखील बालवयातच व्यसनाधीन झाला असून त्याला मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्याला तिथे प्रवेश दिला गेला नाही असेही सांगण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!