News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

१. शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण या तीन गोष्टींची जाहीरनाम्यात हमी देणाऱ्या राजकीय पक्षाला मुस्लिम समाज निवडणुकांमध्ये प्राधान्य देईल, असा निर्णय मुस्लिम समन्वय समितीच्या पुण्यातील राज्यव्यापी चिंतन परिषदेत घेण्यात आला
२. मराठा आरक्षण: विरोधक जनहित याचिकादारांनी महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, कायद्याच्या बाहेर जाऊन काय घडले, कशाचे उल्लंघन झाले, याविषयी काहीही दाखवले नाही. आयोगाची स्थापना आणि कार्ये पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसारच झाल्याच राज्य सरकारचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद
३. महाशिवरात्री पर्वाच्या दिवशी प्रयागराज येथे महाकुंभाला भेट देऊन त्रिवेणी संगमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नान केले.
४. मोदींच्या कार्यप्रणालीवर हवा तेवढा आक्षेप घ्या. परंतु देशहिताच्या मुद्यांवर राजकारण करू नका; पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांना सल्ला
५. देशाच्या शत्रूंना घरात घुसून मारत राहणार. देशातील निर्दोष नागरिकांची हत्या आता सहन केली जाऊ शकत नाही. देशाच्या सुरक्षिततेची मला चिंता – पंतप्रधान मोदी
६. आम्हाला मोदींकडून देशभक्तीचे धडे घेण्याची गरज नाही- काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे
७. श्रीनगर – काश्मीरमधील त्राल परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूँछमध्येही गोळीबार
८. औरंगाबाद: शहागंज परिसरातील बॉम्बे सुपारी स्टोअरमधून जप्त करण्यात आलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला प्रकरणी आरोपी श्रेणिक सुरेशचंद्र सुराणाला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी
९. श्रीनगर येथे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांची खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतली भेट
१०. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचं सैनिकांना आवाहन
११. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. सरकारकडून या हल्ल्यांचे राजकारण करण्यात येत आहे. संसदीय समितीपुढे याची चौकशी झाली पाहिजे?, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
१२. अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी बहुजन समाज पक्षाचे मुद्देसर शेख विजयी; भाजप-राष्ट्रवादी व बहुजन पक्ष आघाडीचा शिवसेनेला धोबीपछाड
१३. देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, शिवमंदिरांमध्ये भाविकांची रिघ