मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच : राज ठाकरे यांची पत्रकारांशी बातचीत

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या दुसऱ्या त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा केली. राज ठाकरे हे औरंगाबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. मात्र अचानकच त्याच्या कार्यक्रमांमध्ये बदल झाल्याने तीन दिवसांचा दौरा रद्द करून ते उद्या सकाळी ते मुंबईला परतणार आहेत. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेशी बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केलं. ते म्हणाले कि , शरद पवारांचे आणि माझे वैयक्तिक संबंध आहेत. ईव्हीएम संदर्भात बोलण्यासाठी त्यांना भेटलो होतो. पण आमच्या मैत्रीच्या चर्चा रंगवल्या गेल्या. पवारांशी माझे चांगले संबंध असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच आहे. काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांनी जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही. मी मांडलेल्या मुद्द्यांवर अद्याप कोणताही पक्ष बोललेला नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा एक वर्ष पूर्ण झाले आहे. पुलवामा हल्ला हा घटवून आणला होता अशी आक्रमक प्रतिक्रिया त्यावेळी राज ठाकरेंनी दिली होती. यासंबंधी प्रश्न विचारला असता पुलवामा हल्ल्यामध्ये अनेक संशयास्पद पुरावे समोर आले होते असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.
यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी बिनधास्त चर्चा केली. मनसेनं मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. दुपारी काही पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आणि सायंकाळी चार वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरे यांनी चर्चा केली. औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत. महापालिका निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे औरंगाबाद येथे मुक्कामी येणार असल्याने शहरातील प्रमुख चौकात त्यांना ‘हिंदू जननायक’ अशी बिरुदावली लिहिली आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता मला हिंदू जननायक म्हणू नका, असे ते म्हणाले.