ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून कोसळला , ७ ठार ३० जखमी

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील बेळगावजवळ ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व ऊसतोड मजूर असल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळची ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रित सुटल्याने हा भीषण अपघात झाला. जखमी मजुरांवर बेळगावमध्ये उपचार सुरू आहेत.