निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरण : मुकेश सिंहची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळताच विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना १ फेब्रुवारीला फाशी देण्याचा निर्णय जाहीर झालेला असतानासुद्धा आरोपींच्या वतीने एक एक करून दर दोन चार दिवसांनी याचिका दाखल करण्यात येत असल्याने २२ जानेवारी नंतर आता पुन्हा १ फेब्रुवारीवरही गंडांतर येते कि काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असला तरी निर्भयाच्या आईने १ फेब्रुवारीलाच आरोपींना फाशी दिली जाईल असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आता दोषींपैकी एक विनय शर्माच्या वतीने त्याचे वकील ए.पी. सिंह यांनी बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला आहे.
विशेष म्हणजे विनय शर्माची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. तर अक्षय आणि पवन यांच्याकडे अजूनही फेरविचार याचिकेचा पर्याय शिल्लक आहे. फेरविचार याचिका फेटाळल्यावर दया अर्ज आणि तोही फेटाळल्यावर त्याला आव्हान देण्याचा पर्याय त्यांच्याजवळ शिल्लक आहे. विनयची दाय याचिका फेटाळली तर तोही मुकेशप्रमाणे आव्हान याचिका दाखल करू शकतो. आता अवघ्या दोन दिवसांवर फाशीची येऊन ठेपली असताना या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे पुन्हा फाशीची प्रक्रिया लांबणीवर पडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुप्रीम कोर्ट ने 2012 दिल्ली गैंगरेप के दोषी मुकेश की याचिका को खारिज कर दिया। कोर्ट के अनुसार 'सभी दस्तावेजों को ध्यान में रख कर ही राष्ट्रपति ने फैसला लिया था।' pic.twitter.com/sDAzsMzA72
— ANI_HindiNews (@AHindinews) January 29, 2020
दुसरीकडे २०१२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या सामूहिक बलात्कारात चार दोषी मुकेश, अक्षय, पवन आणि विनय यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता चौघांनाही तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार असून फाशी टाळण्यासाठी दोषींची विविध मार्गांनी धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांच्या विरोधात डेथ वॉरंटही जारी केले आहे. मुकेशने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुकेशने आपल्या याचिकेत तुरुंगात शोषणाचे कारण दिले होते. कोर्टाला त्याचे सर्व युक्तिवाद निराधार वाटले. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत म्हटले आहे की, तुरूंगातील अत्याचार हा दया याचिका फेटाळण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाचा आढावा घेणारा आधार असू शकत नाही.
देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशी कधी दिली जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. दुसरीकडे मात्र कायद्यातील पळवाटा शोधून फाशीची तारीख टाळण्यासाठी दोषींकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. काल मंगळवारी दोषी मुकेश सिंह कुमार याच्यावर तुरुंगात लैंगिक छळ होत असल्याचा आरोप त्याच्या वकिलाने केला होता. त्यानंतर आज दोषी अक्षय सिंहनेही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे तर विनयने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे.