आमची मुंबई : नाईट लाईफ बरोबर आता ‘बेस्ट’ही आज मध्यरात्रीपासून ‘मुंबई २४ तास’

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच आज मध्यरात्रीपासून ‘मुंबई २४ तास’ होणार असून, या संकल्पनेला साकारण्यासाठी बेस्ट उपक्रमाचाही हातभार लागणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून चोवीस तास सुरू राहणाऱ्या मुंबईचा आढावा घेण्यात येणार असून आठवडय़ाभरात दिवसभर सेवा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
यासाठी मध्यरात्रीच्या वेळेत बेस्टने वातानुकूलित मिनी बसगाडय़ा चालवण्याची तयारी सुरू केली आहे. चार दिवस मुंबईचा आढावा घेतल्यानंतर त्याचा अहवाल तयार करूनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.