चर्चेतली बातमी : नासिरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांच्या काय म्हणून रंगला कलगी तुरा ?

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगलं आहे. नसीरुद्दीन शहा यांनी केलेल्या टीकेला प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी रोखठोक उत्तर देताना नसीरुद्दीन शहा यांची विधानं मी गंभीरपणे घेत नाही. त्यांचं संपूर्ण आयुष्य नैराश्य आणि वैफल्यग्रस्तेत गेलं आहे. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याचा प्रश्नच येत नाही, असा पलटवार करतानाच माझ्या रक्तात फक्त हिंदुस्थान आहे, असा टोला अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शहा यांना लगावला आहे.
एका वेबसाईटला मुलाखत देताना नासिरुद्दीन शहा यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून (एनआरसी) देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अनुपम खेर व या आंदोलनापासून दूर राहणाऱ्या बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी तसेच बुद्धिजीवी वर्गाप्रती फारच अंसेवदेनशीलता दाखवत आहेत. कदाचित विद्यार्थीदशेतून गेलेले नसल्याने ते असे वागत असावेत, असा टोला नसीरुद्दीन यांनी लगावला होता . ‘अनुपम खेर या मुद्द्यावर फारच पुढाकार घेताना दिसत आहे. मला विचाराल तर त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तो एक जोकर आहे. एनएसडी आणि एनएफटीआयआयच्या काळापासूनच तो तसा आहे. अनुपम एकप्रकारचा मनोरुग्ण आहे हे त्याच्या समकालीन सर्वच सहकाऱ्यांना माहीत आहे. हा गुण त्याच्या रक्तातच आहे’, असे म्हटले होते.
दरम्यान नसीरुद्दीन शहा यांनी केलेल्या टीकेनंतर अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून शहा यांना प्रत्युत्तरदिले . खेर यांनी ट्विटरवरआपला व्हिडिओ अपलोड करून उत्तर दिलं आहे. या ट्विट मध्ये अनुपम खेर यांनी म्हटले आहे कि , नसीरुद्दीन शहा यांनी माझ्याबाबत दिलेली मुलाखत पाहिली. त्यांनी माझं कौतुक करताना मला जोकर, मनोरुग्ण म्हटलं. मला गंभीरपणे न घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मी मनोरुग्ण असून हा गुण माझ्या रक्तातच आहे, असंही त्यांनी मला म्हटलं. त्याबद्दल त्यांचं मी आभारच मानतो, असं खेर यांनी म्हटलं आहे.
जनाब नसीरुदिन शाह साब के लिए मेरा प्यार भरा पैग़ाम!!! वो मुझसे बड़े है। उम्र में भी और तजुर्बे में भी। मै हमेशा से उनकी कला की इज़्ज़त करता आया हूँ और करता रहूँगा। पर कभी कभी कुछ बातों का दो टूक जवाब देना बहुत ज़रूरी होता। ये है मेरा जवाब। 🙏 pic.twitter.com/M4vb8RjGjj
— Anupam Kher (@AnupamPKher) January 22, 2020
आपल्या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे कि , नसीरुद्दीन शहा माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही मोठे आहेत. मी नेहमीच त्यांच्या अभिनयाची आणि कलेची इज्जत करतो आणि करत राहील. मात्र कधी कधी दोन शब्दात कान टोचणंही महत्त्वाचं असतं. मी त्यांचं म्हणणं कधीच गंभीरपणे घेत नाही. कधीच त्यांच्याबद्दल वाईट मत व्यक्त केलेलं नाही. पण आता मला बोलायचं आहे, असं सांगतानाच तुम्ही दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि विराट कोहलींवरही टीका करता. याचा अर्थ मी चांगल्या कंपनीत आहे, असा होतो. यापैकी कुणीही तुमच्या विधानाला गंभीरपणे घेतलेलं नाही. कारण काही पदार्थांचं सेवन केल्यानंतर चूक काय आणि बरोबर काय हे तुम्हाला कळत नाही. त्याचा तुम्हाला अंदाज येत नाही. त्यामुळेच तुमच्या टीकेवर कुणी प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. तुम्ही प्रचंड यश मिळवल्यानंतरही तुमचं संपूर्ण आयुष्य नैराश्यात घालवलं. त्यातूनच या टीका होत असाव्यात, माझ्यावर टीका करून एक-दोन दिवस तुम्ही चर्चेत येत असाल तर तुम्हाला हा आनंद मी नक्कीच भेट म्हणून देतो. तुम्ही माझ्या रक्तात काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या रक्तात दुसरं तिसरं काही नाही तर फक्त हिंदुस्थान आहे. अनुपम खेर हे नरेंद्र मोदी यांचे समर्थक म्हणून ओळखले जतात त्यामुळे नासिरुद्दीन शहा यांनी त्यांना टीकेचे लक्ष केले होते.