“इंटर्नल मार्क्स” देण्यासाठी शिक्षकाने केली विकृत मागणी , विद्यार्थीनी भयभीत तर पालक संतप्त

इंटर्नल मार्क्स देण्यासाठी बेलापूर ता. श्रीरामपूर येथील एका नामांकित ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे येथील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इंटरनल मार्क्स देण्यावरून शिक्षकाने अशा प्रकारे विद्यार्थीनीला ब्लँकमेल केल्याचं समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले आहेत. बेलापूर गावीतल ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या दालनासमोर आणि बेलापूर पोलिस चौकीसमोरही ठिय्या आंदोलन केलं आहे.
ग्रामस्थ आणि पालकांच्या म्हणण्यानुसार ‘सदर शिक्षक हा लिंगपिसाट असून यापूर्वीही त्याने अशा पद्धतीचे नीच कृत्य केलं आहे,’ असा आरोप केला आहे. संबधित शिक्षकाचे तात्काळ निलंबन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता आक्रमकपणे समोर येत आहे. पोलिसांनी मात्र अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही.
काही दिवसांपूर्वी नांदेडमध्येही असाच प्रकार समोर आला होता. विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच अत्याचार केल्याची खळबळनक घटना नांदेडमध्ये घडली होती. शंकरनगरमध्ये इयत्ता ७ वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ४ शिक्षकांनी अत्याचार केले. भाजप उपाध्यक्ष आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अध्यक्ष असलेल्या शाळेत ही घटना घडली. शाळेतील मुलीवर २ महिन्यापूर्वीच अत्याचार करण्यात आले. त्यानंतर आता मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे हा सर्व प्रकार उघडीस आला. अत्याचाराची ही घटना समोर आल्यानंतर आरोपी २ शिक्षकांसह घटनेची माहिती न देणाऱ्या अन्य ३ अशा एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.