Aurangabad Crime : डाॅ. कलवणे घरफोडी प्रकरणातील दुसरा आरोपी नाशिकहून अटकेत
Advertisements
Advertisements
औरंगाबाद – पुंडलिकनगर पोलिसांनी डाॅ.कलवणे घरफोडी प्रकरणातील दुसरा आरोपी शंकर जाधव नाशिकच्या पंचशील नगरात शंकर जाधव लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबर्याने दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपस करून त्याला सोमवारी नाशिकहून अटक करुन आणल्याची माहिती पोलिसउपायुक्त राहूल खाडे यांनी दिली.
शंकर जाधव हा सुध्दा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या हिश्श्याचा मुद्देमाल त्याने जालना आणि किनवट परिसरात लपवून ठेवला असल्याची माहिती माहिती उघंड झाली आहे. पुढील तपासासाठी आरोपीचा पी.सी.आर. घेणे गरजेचे असल्यामुळे आज जाधव ला कोर्टात हजर करुन पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे उपायुक्त खाडे यांनी सांगितले.
Advertisements
