पुन्हा एकदा मोहन भागवत : राज्यघटनेवर आम्हाला विश्वास पण आम्ही १३० कोटी जनता हिंदूच मानतो

RSS chief Mohan Bhagwat: When workers of RSS say that this country belongs to Hindus & 130 crore people are Hindu, it doesn't mean that we want to change anyone's religion, language or caste… We don't want any power center other than the Constitution because we believe in it. pic.twitter.com/8nxAizVu0n
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 19, 2020
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राज्यघटनेवर आम्हाला विश्वास आहे. कोणत्याही सत्ताकेंद्रावर आम्ही विश्वास ठेवत नाही, असे मत यांनी व्यक्त करताना कोणाच्याही धर्माला धक्का लागला जाऊ नये. देशातील १३० कोटी जनता ही हिंदूच असल्याचं आम्ही मानतो, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. ते म्हणाले कि, ”संघाचे स्वयंसवेक जेव्हा म्हणतात की हे हिंदुराष्ट्र आहे आणि देशातील १३० कोटी जनता हिंदू आहे, याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाचा धर्म, जात आणि भाषा बदलू इच्छितो. आम्हाला राज्यघटनेशिवाय इतर कोणतेही सत्ताकेंद्र नकोय. कारण आमचा राज्यघटनेवर विश्वास आहे.”
देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना भागवत म्हणाले कि , ”सर्व भारतीय हिंदूच आहेत,” असं त्यांनी गेल्या महिन्यात तेलंगणातील एका कार्यक्रमातही केलं होतं. त्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला. ”भावनिकरित्या एकत्र राहण्याचा प्रयत्न करा, असं आपल्याला राज्यघटना सांगते. पण ही भावना कोणती? कोणत्या भावनेनं एकत्र यायचं? ती म्हणजे – हा देश आपला आहे आणि विविधतेत एकदा हा आपल्या पूर्वजांचा वारसा आपण चालवतोय. अशीच भावना आपल्या मनात असायला हवी. हेच तर हिंदुत्व आहे,” असंही भागवत यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान मुरादाबाद येथे शनिवारी संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना भागवत म्हणाले की, ”आरएसएस हा काही भाजपाचा रिमोट कंट्रोल नाही. संघाचा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही. संघ केवळ देशातील सांस्कृतिक व नैतिक मानवी मूल्ये आणि लोकांमधील विश्वास वाढवण्यासाठी काम करते.”