भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले काॅंग्रेसमध्ये

भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपची सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला आहे. सावित्रीबाई फुले या बहराइचमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या होत्या. पण, त्यांनी भाजपची साथ सोडल्यानं निवडणुकीच्या तोंडावर भाजपला बसलेला हा मोठा धक्का आहे.