चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा लागल्यानंतर फरार झालेलय आरोपीला गुन्हे शाखेने घातल्या बेड्या

चोरीच्या एका गुन्ह्यात शिक्षा लागल्यापासून फरार असलेल्या आरोपीला शुक्रवारी (दि. 10) गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकर प्रभू नेटके उर्फ अजय (39, रा. निसर्ग कॉलनी, पेठेनगर, भावसिंगपुरा मुळ रा. कांदा मार्केट जयभीम नगर श्रीरामपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय पवार यांना शिक्षा वॉरंट मधील फरार आरोपी निसर्ग कॉलनीत उभा असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पवार यांनी सहकार्यांसह सापळा लावुन शंकर नेटके उर्फ अजय याला अटक केली. आरोपी शंकर उर्फ अजय नेटके याच्याविरुद्ध क्रांतीचौक, जवाहरनगर, श्रीरामपूर अशा विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नेटकेला क्रांतीचौक पोलिस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यात 18 महिन्यांची शिक्षा न्यायालयाने ठोठाविलेली आहे. तेंव्हा पासून तो फरार होता. आरोपीने ओळख लपविण्यासाठी डोक्यावरील व दाढीचे केस वाढवून तो पेठेनगर येथे राहत होता.
ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय पवार, सहाय्यक फौजदार विठ्ठल जवखेडे, हवालदार किरण गावंडे, पोलिस नाईक गोविंद पचरंडे, हवालदार सुनिल बेलकर, संदीप सानप, विजय पिंपळे, शेख बाबर आदींनी केली.