News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या…

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या…
1. आमच्याकडे एअर स्ट्राइकचे पुरावे आहेत, ते कधी उघड करायचे हे सरकार ठरवेल: लष्कर
2. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्याची बाजू मांडण्यासाठी आणखी एका ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत निर्णय
3. नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द, शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी परत करणार, उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
4. वंचित बहुजन आघाडीची शरद पवारांच्या बारामतीत महासभा:प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती :शरद पवार, अजित पवार यांच्यावर वक्त्यांची टीका
5. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नाशिक येथील कुणाल मनीषा फालक या तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांची मारहाण
६. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची भेट घेतली
७. विंग कमांडर अभिनंदन यांनी हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांची भेट घेतली, पाकिस्तानातील घटनेची दिली माहिती
८. हवाई दलाचे पायलट देशासाठी बलिदान देत आहेत, पण मोदी हवाई दलाचा पैसा अनिल अंबानीच्या खिशात घालत आहेत, राहुल गांधी यांची टीका
९. उत्तर प्रदेश- मायावती यांनी आमच्यासोबत आघाडी केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद: अखिलेश यादव
१०. उत्तर प्रदेश: संविधान वाचवण्यासाठी सपा-बसपाची आघाडी, सपा नेते अखिलेश यादव यांचं वक्तव्य
११. उद्यापासून भारत-पाक समझोता एक्सप्रेस पुन्हा सुरू होणार
१२. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला
१३. आमच्यासाठी निवडणुका नव्हे तर देशाला आधी प्राधान्य आहे, पुलवामा झाल्यानंतर जवानांना पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घातलं, अमित शहा यांचा घणाघात
१४. मुंबई विमानतळावर धमकीचा फोन, अॅलर्ट जारी, तपास सुरू
१५. चौकशीसाठी प्रसिद्ध उद्योगपती वेणूगोपाल धूत ईडीच्या कार्यालयात दाखल
१६. कोर्टाने रॉबर्ट वाड्रा यांच्या अंतरिम जामिनाची मुदत १९ मार्च पर्यंत वाढवली
१७. सीमेवर भारत-पाकचं नाटक, झळ मात्र काश्मिरींना बसतेय, मेहबूबा मुफ्तींचा आरोप
१८. मंगळवेढ्याचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्याविरोधात बोलणाऱ्या उपोषणकर्त्याला कार्यकर्त्यांनी केली भर चौकात मारहाण