अभिनंदन यांना भगवान महावीर अहिंसा पुरस्काराची घोषणा

अखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीद्वारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सिमहैकुट्टी (जैन) यांना देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मणिंद्र जैन यांनी नवी दिल्ली येथे दिली.
संस्थेचे महाराष्ट्राचे संयोजक पारस लोहाडे यांनी येथे सांगितले, की महासमितीतर्फे भगवान महावीर अहिंसा पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. हे पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात मानवता, देश, धर्म व समाजासाठी असाधारण काम करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येईल. या अंतर्गत २ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम, प्रशस्ति व ट्रॉफी देण्यात येईल. संस्था मागील अनेक वर्षांपासून विविध सामजिक कार्य करीत आहे. आगामी भगवान महावीर जंयतीच्या दिवशी म्हणजे १७ एप्रिल रोजी दिल्ली येथे भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.