पंतप्रधान मोदींच्या टीकेला काँग्रेसने दिले हे उत्तर

मोदीजी ये आंदोलन संसद नहीं, आपके विभाजनकारी कारनामों के खिलाफ हो रहा है। हम आपको देश नहीं तोड़ने देंगे। रही बात पाकिस्तान की, तो इसी हिंदुस्तान ने 1948, 65, 71, कारगिल में जो घाव उसे दिए हैं, वो अब तक नहीं उबर पाया। पाकिस्तान को जवाब ही देना है तो बिरयानी और आम का खेल बंद कीजिए। https://t.co/ZdaTDawNW8
— Congress (@INCIndia) January 2, 2020
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले असून सध्याचे आंदोलन संसदेविरोधात नसून केंद्र सरकारच्या फुटीरतावादी धोरणाविरोधात सुरू असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील जाहीर सभेत बोलताना भारतीय संसदेविरोधात नव्हे तर पाकिस्तानविरोधात आंदोलन करा, अशी टीका विरोधकांवर केली होती. त्यावर काँग्रेसने आता पलटवार केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसने म्हटले आहे कि , सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन हे संसदेविरोधात नसून तुमच्या फुटीर धोरणांविरोधात असल्याचे म्हणत आम्ही देशाचे तुकडे होऊ देणार नसल्याचेही काँग्रेसने म्हटले. काँग्रेसने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजयाची आठवण पंतप्रधान मोदींना करून दिली आहे. पाकिस्तानला १९४८, १९६५, १९७१ आणि कारगिल युद्धात ज्या जखमा दिल्या आहेत. त्यातून ते अजून सावरले नाहीत. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बिर्याणी आणि आंब्याचा खेळ बंद करा असा सणसणीत टोला काँग्रेसने लगावला आहे.
२६ डिसेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालिन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली होती. त्यावेळेस पासून पंतप्रधान मोदी यांनी शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाल्ली असा विरोधक टोला लगावतात. तर, त्याच वर्षी शरीफ यांनी ईदच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना आंबे पाठवले होते.