महाविकास आघाडीत खातेवाटपावरून कुठलीही नाराजी नाही , आज उद्या मुख्यमंत्री माहिती देतील : शरद पवार

महाविकास आघाडीच्या खाते वाटपावरून कुठल्याही पक्षात पक्षात नाराजी नाही, खातेवाटपाचा विषय आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेला असून याचा निर्णय आज किंवा उद्या होईल. राष्ट्रवादीमध्ये कुठलाही वाद नाही उलट आम्ही अमुक खाते घ्या म्हणतोय आणि मंत्री नको म्हणताहेत, अशी अवस्था सध्या राष्ट्रवादीत आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना केला. सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. नव्या सरकारमध्ये मध्ये खातेवाटपावरून अजिबात गोंधळाचे वातावरण नाही. खात्याचे सगळे निर्णय झाले आहेत कुणी ? कुठलं खातो घ्यायचं ? हे पण ठरलेलं आहे. उद्या मुख्यमंत्री याबद्दल निर्णय जाहीर करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मोदी सरकार आणि देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पवार म्हणाले कि , आताची राजकीय परिस्थिती पाहिली तर कुठलाही एक पक्ष पर्याय देऊ शकेल अशी अवस्था नाही. त्यामुळे इतर राज्यातही असं वातावरण आहे. आज लोकं एक पर्याय शोधताहेत तो पर्याय कुठला तरी एक पक्ष देईल, अशी अवस्था देशात मुळीच नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकेल, असा एक विश्वास जाणकारांच्या मनामध्ये आहे आणि त्यादृष्टीने लोक महाराष्ट्राकडे बघत आहे. बघुया, काय होतंय, असं म्हणत शरद पवारांनी नव्या रणनीतीचे संकेत दिले आहे. देशात महाराष्ट्राचा राजकीय पॅटर्न वापरतात की नाही हे माहीत नाही. मात्र, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात काय घडलं आणि शरद पवार यांनी जे काही केलं आहे त्यातून आम्ही प्रेरणा घेतली आहे. असाच विचार सगळ्यांनी करायचं ठरवलंय. कालच मला ममता बॅनर्जी यांचं पत्र भेटलं आहे त्यांनी इतर पक्षाबरोबर बैठक बोलावली आहे, अशी माहितीही पवारांनी दिली.
राज्यातील खातेवाटपाबाबत बोलताना ते म्हणाले कि , मी अनेकदा मंत्री होतो. खातेवाटप झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्हाला कळायचं की, आम्हाला काय काम करायचंय हे एका पक्षाचं असताना असं व्हायचं. यावेळेस मात्र तीन पक्ष आहेत. सुदैवानं यावेळेस आठ दिवसापूर्वी ठरलेलं आहे. ती कुठल्या पक्षाला कुठली खाती द्यायची आता त्या पक्षांनी ठरवायचं आहे की कुठल्या मंत्राला कुठलं खातं द्यायचं. आम्ही यावेळेस नवीन पिढीला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि नव्या पिढीला कामही जास्त देणार आहोत.
दरम्यान राष्ट्रवादीचे खा. डी.पी. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल बोलताना ते म्हणले कि , हिंदी मधला अत्यंत विद्वान उत्तम लेखक आणि विचारवंत म्हणून त्यांचा लौकिक होता. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्या काळात त्यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यांचे सहकारी म्हणून काम करत असताना शासकीय कामाच्या बरोबर ते इतर देशांच्या कामावर सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातील महत्त्वाच्या देशांशी राजीव गांधींचे मेसेंजर म्हणून संपर्क साधण्याचे काम ते करत होते. पाकिस्तानचे प्रधानमंत्री असो आजूबाजूच्या सर्व देशांचे पंतप्रधान किंवा मंत्री असो या सर्व देशांच्या मंत्र्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध असायचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून महत्त्वांच्या भूमिकांवर पार्श्वभूमी तयार करायचं काम ते करत होते. ते अत्यंत सुस्वभावी होते. गाडा अभ्यासक आणि भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतं, अशी भावना पवारांनी व्यक्त केली.