Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुन्हा एकदा रावसाहेब दानवे झाले व्हायरल …

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची एक व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून त्यात त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत असे  वक्तव्य रावसाहेब दानवेंनी  केले असल्याचे दिसतआहे. जालन्यात प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकास कामांच्या बैठकीत बोलताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे . या क्लिपमध्ये ते असेही म्हणतात कि , तुम्ही माझ्या मागे उभं राहण्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो आणि त्यांना (विरोधकांना) पैसे भेटू नाही राहिले असंही वक्तव्य केलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये रावसाहेब दानवे उपस्थितांनी विचारताना दिसत आहेत की, मोदींना पंतप्रधान करणार का ?….पुढे ते म्हणतात की, ‘कोणी काहीही म्हणो काहीही सांगो…देशातले सगळे चोट्टे एक झाले आहेत आणि मोदींना होऊ नका सांगू लागले आहेत. आपल्याकडेही सगळे चोट्टे एकत्र झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडू असं म्हणू लागलेत. का तर मी मोदींजीचा माणूस आहे’.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!