अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवणाऱ्याला तीन महिन्याची कोठडी

अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवणाऱ्या एका ४१ वर्षीय इसमाला ‘ पॉक्सो ‘ न्यायालयाने तीन महिन्यांची कोठडी सुनावली आहे. अमरजीत कुमार नकोजिया असे या आरोपीचे नाव आहे.
गेल्या आठवड्यात विशेष न्यायमूर्ती ए. डी. देव यांनी या आरोपीला दोषी ठरवले आणि ही शिक्षा दिली. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अॅक्ट (पॉक्सो) अंतर्गत तरतूदींच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १२ वर्षीय पीडितेने न्यायालयाला सांगितले की तिचे वडील मुंबई उपनगरात अंधेरी येथे वर्तमानपत्राचा स्टॉल चालवतात. २०१५ साली ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा ती तिच्या मोठ्या बहिणीसोबत तिच्या वडिलांना मदत करण्यासाठी स्टॉलवर आली होती. नंतर, आरोपीने पीडितेला सांगितले की त्याने एक नवा मोबाइल फोन घेतला आहे आणि तो फोन दाखवण्याच्या बहाण्याने आरोपी कनोजियाने तिला अश्लील व्हिडिओ दाखवला, अशी माहिती तिने कोर्टाला दिली. आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.