Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : खाजगी ड्रायव्हर विरुध्द अॅट्राॅसिटी आणि बलात्काराचा गुन्हा,पाच वर्षांपासून करंत होता शोषण

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – पाच वर्षांपासून ओळखीचा गैरफायदा घेत महिलेचे शोषण करणार्‍या खाजगी वाहन चालका विरुध्द छावणी पोलिस ठाण्यात अॅट्राॅसिटी आणि बलात्काराचा गुन्हा गुरुवारी दाखल होऊन तो सातारा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
आकाश गजानन जाधव रा.पुणे असे आरोपीचे नाव आहे. २०१४ साली शहरातील एका तरुणीसोबत आरोपीची ओळंख झाली.त्यानंतर वर्षभर त्याने पिडीतेचे शोषण केल्यावर जात आडवी येत असल्यामुळे लग्नास नकार दिला. तरीही पिडीतेने हा प्रकार घरच्यांपासून लपवला पण पिडीतेचे लग्न २०१५ साली झाल्यावर आकाश जाधव ने प्रेम प्रकरण चव्हाट्यावर आणण्याची धमकी देत पिडीते कडून फायनान्स कंपनीकडून कार घेतली. पण या नंतर खरा प्रकार पिडीतेच्या सासरी सांगण्याची धमकी देत आकाश जाधव ने पिडीतेला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Advertisements

शेवटी पिडीतेच्या सासरच्यांना हा प्रकार कळला त्यामुळे पिडीतेने तिने आरोपीला घेऊन दिलेली कार अन्य एका व्यक्तीकडून सोडवून आणली  व आकाश जाधव विरुध्द शोषण आणि अॅट्राॅसिटीची तक्रार देताच गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळुखे करत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!