Aurangabad Crime : दागिने घेऊन प्रियकरासह विवाहिता फरार, मुकुंदवाडीतील घटना
औरंंंगाबाद : विवाहित महिलेने विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या प्रियकरासोबत पाच तोळ्यांचे दागिने आणि साठ हजारांची रोख लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा प्रकार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याचे विवाहितेच्या पतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अनमोल उर्फ गोट्या अनिल सवई व विवाहितेविरुध्द याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड बायपास रोडवरील बोर्डेनगरातील एका हॉटेल कामगाराच्या पत्नीचे अनमोल उर्फ गोट्यासोबत विवाहबाह्य संबंध आहे. हा प्रकार विवाहितेच्या पतीला आता माहिती झाला. अनमोल हा नेहमी त्या कामगाराच्या घरी ये-जा करायचा. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास अनमोल कामगाराच्या घरी गेला. यावेळी अनमोलने विवाहितेसोबत फरार होण्यासाठी घरातून पाच तोळ्याचे दागिने व साठ हजारांची रक्कम घेतली. कामगाराच्या पत्नीने व तिचा प्रियकर अनमोल यांनी संगणमत करुन दागिने व रोख लांबविली.
हा प्रकार निदर्शनास आल्यावरुन कामगाराने पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक हगवणे करत आहेत