Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुश खबर

Spread the love

स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी सर्व प्रकारच्या कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट कमी केला आहे. १० बेसिस पॉइंट कमी केली आहे. नवे दर मंगळवारपासून लागू होणार आहेत. यानंतर कार आणि इतर एमसीएलआर लिंक्ड कर्जे स्वस्त होतील.

एसबीआयने सध्याच्या चालू आर्थिक वर्षात  एमसीएलआरने सलग आठव्यांदा  कपात केली आहे. एसबीआयने केलेल्या निवेदनानुसार , फंडात कमी झालेल्या खर्चाचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी आम्ही एमसीएलआरमध्ये ०.१० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एसबीआयमध्ये एमसीएलआर वार्षिक ७.९० टक्के इतका होईल. जो आतापर्यंत ८ टक्के आहे. एसबीआयने सांगितलं की गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या मार्केट शेअरमधील २५ टक्के भागावर त्यांची पकड आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्याच आठवड्यात रेपो रेट कायम ठेवल्याचं सांगितलं होतं.

एमसीएलआरमध्ये कपात केल्याने व्याजदर कमी होतात. मात्र यामुळे सर्व कर्ज घेणाऱ्यांचे कर्ज कमी होणार नाही. नव्याने कर्ज घेणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर जुनी कर्जे असलेल्यांना थोडावेळ वाट पहावी लागेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!