Jalna Crime : अल्पवयीन मुलीला डांबून लैंगिक अत्याचार , दोन महिलांसह तीन अटकेत , पोलिसांनी केली मुलीची सुटका

जालना शहरातील सुंदरनगर भागातून बेपत्ता झालेल्या तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन हिंगोली जिल्ह्यात डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या संदर्भात चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले कि , पीडित अल्पवयीन मुलगी १३ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली म्हणून तक्रार नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा शोध चालू होता. त्यात पोलिसांना माहिती मिळाली कि , पीडित मुलीला सेनगाव येथे एका शेतात डांबून ठेवले आहे. त्यानंतर घातस्थळी धाव घेऊन या मुलीची सुटका करण्यात करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी हिंगोली जिल्ह्यतील आरोपी दत्ता धनगर याच्यासह दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलीची विक्री करण्याचा आरोपींचा डाव होता किंवा कसे, या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान शुक्रवारी रात्री उशीरा जालना जिल्ह्यातील दोन महिलांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या पूर्वी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यात अधिक तपासानंतर बलात्काराचे कलम वाढविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी सांगितले. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.