Hyderabad Encounter : तेलंगणा हायकोर्टात याचिका, ९ डिसेंबरपर्यंत आरोपींच्या मृतदेहावर होणार नाहीत अंत्यसंस्कार

देशभर गाजत असलेल्या हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे पोलिसांना आता सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.
सदर प्रकरणाची पुढची सुनावणी ही ९ डिसेंबरला होणार असून तोपर्यंत आरोपींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार करू नका असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. काही संघटनांनी ही याचिका दाखल केली आहे. या एन्काउंटरने देशभर खळबळ उडवून दिली होती. सामान्य माणसांनी त्याचं स्वागत केलंय तर अनेक नेते आणि संघटनांनी याचा तीव्र विरोध केलाय. त्यामुळे आता यापुढे हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसांची कसोटी लागणार असून त्यांना सर्व प्रश्नांची उत्तर देत सगळे पुरावे सादर करावे लागणार आहेत.