Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Hyderabad Encounter : पोलीस आयुक्तांनी केला खुलासा , कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

Spread the love

आज हैदराबादेत झालेल्या एन्काउंटरवरून सर्वत्र चर्चा चालू असताना एन्काउंटरबाबत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ३० मिनिटांत काय घडले यांची सविस्तर माहिती दिली. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी चकमकीच्या घटनास्थळावरून ही पत्रकार परिषद घेतली. घटनास्थळावरून आरोपींनी पोलिसांकडील शस्त्रे हिसकावली व पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत आरोपी ठार झाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना सज्जनगार यांनी सांगितले की, आरोपींनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरील पोलिसांनी आरोपींना चेतावनी दिली. मात्र, त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला. आरोपींच्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले असल्याचे सज्जनगार यांनी सांगितले. मानवाधिकार आयोग किंवा अन्य कोणत्याही संघटनांच्या चौकशी, प्रश्नांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त सज्जनगार पुढे म्हणाले कि , की, आम्ही योग्य पद्धतीने प्रकरणाचा तपास केला. त्यानंतरच चारही आरोपींना अटक केली. त्याशिवाय पुरेस पुरावेदेखील आमच्याकडे होते. त्याआधारेच कोर्टाने आरोपींना १० दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. आरोपींची ४ व ५ डिसेंबर रोजी चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा घटनास्थळी नेण्यात आले. तेव्हा आरोपी चिंताकुटा आणि आरिफ यांनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावली. त्याशिवाय काठी आणि दगडाने पोलिसांवर हल्ला करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय दोन आरोपींनी पोलिसांवर गोळीबारदेखील केला. घटना सकाळी ५.४५ ते ६.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. दोन पोलीस जखमी असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

“खूप तपास केल्यानंतर आम्ही चार आरोपींना अटक केली होती. ३० तारखेला त्यांना अटक केली होती. ४ तारखेला आम्हाला आरोपींची कस्टडी मिळाली. यावेळी आम्ही गुन्हा कसा केला याची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी पीडितेचा मोबाइल आणि इतर गोष्टी घटनास्खळी लपवल्या असल्याचं सांगितलं. आरोपींना घेऊन पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. त्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला असता चौघांचा मृत्यू झाला,” अशी माहिती व्ही सी सज्जनार यांनी दिली आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा मध्येही आरोपींना अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता त्यादृष्टीने तपास करत आहोत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच आम्ही सर्व चौकशीला जाण्यास तयार आहोत असंही यावेळी व्ही सी सज्जनार यांनी स्पष्ट केलं. आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले जातील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. शस्त्र कायद्यांतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!