Hyderabad Encounter : चर्चेतला बातमी : पोलीस आयुक्तांकडून चकमकीला दुजोरा

#WATCH Hyderabad: 'DCP Zindabad, ACP Zindabad' slogans raised near the spot where where accused in the rape and murder of the woman veterinarian were killed in an encounter by Police earlier today. #Telangana pic.twitter.com/2alNad6iOt
— ANI (@ANI) December 6, 2019
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातही आरोपींच्या चकमकीला पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तपासादरम्यान या ४ आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या. यात या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणाचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.
हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींची नावे आहेत. या चौघाना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी नेले. ही घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना तपासायचे होते. मात्र, या दरम्यान या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. चारही आरोपी पळून जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणानंतर या चौघांना फाशी द्यावे, अशी मागणी देशभरातून होत होती.
हैदराबादेतील २७ वर्षीय महिला डॉक्टरवर २७ नोव्हेंबरच्या रात्री या चौघांनी अमानुष अत्याचार करीत तिचा जाळून तिचा खून केला होता. पहाटे दूधवाल्याने शव पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला. या निंदनीय घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते.