५१ वर्षाच्या शिक्षकाने केला सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार , पोलिसांनी घातल्या बेड्या

देशभर अनेक ठिकाणचे बलात्काराचे गुन्हे उघडकीस येत सतानाच पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमधील ५१ वर्षाच्या शिक्षकाने सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याचे वृत्त आहे. प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच या शिक्षकाने दुष्कृत्य केल्याची माहिती पोलिस समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रमन खवस या व्यक्तीला अटक केली आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पोस्कोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चंद्रमनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या बाबत पोलिसांनी सांगितले , कि “याप्रकरणामध्ये मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे,” इतर मुले वर्गाबाहेर खेळत असताना या शिक्षकाने मुलीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या मुलीने तिच्या बरोबर घडलेला प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. आईने आधी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. “या मुलीला गुप्तांगाजवळ दुखू लागल्यानंतर आईला विश्वास बसला आणि तीने पोलिस स्थानकात जाऊन शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली,” अशी माहिती चेंगा नारी सेवा समिती या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा दिवाकारी छत्री यांनी दिली आहे. “या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे,” अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
विशेष म्हणजे दार्जिलींगमधील पॉस्को न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी एका ३९ वर्षीय वर्षीय व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे . पाच वर्षापूर्वी या व्यक्तीने एका ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. त्यातच पुन्हा दार्जिलिंगमध्ये अशीच घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे.