भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हेही मागे घेण्याची आ. धनंजय मुंडे यांची मागणी

Senior Nationalist Congress Party (NCP) leader Dhananjay Munde (file pic) has also written a letter to Chief Minister Uddhav Thackeray seeking withdrawal of FIRs registered against social activists and protesters in Bhima Koregaon violence case. #Maharashtra https://t.co/0i7OHIKeh6 pic.twitter.com/Hx0dsQ0tEc
— ANI (@ANI) December 3, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधातील आंदोलकांवर आणि ‘आरे’तील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भीमा कोरेगाव दंगलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. तत्कालीन भाजपा सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावे तसेच भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान त्यांच्या आधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड , आणि प्रकाश गजभिये यांनीही धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे.#BhimaKoregaon @CMOMaharashtra pic.twitter.com/Jve8fMVw1r
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 3, 2019