“‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही घुसखोर …” काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे वादग्रस्त विधान

#WATCH Congress leader Adhir Ranjan Chowdhury:.. Hindustan sab ke liye hai, ye Hindustan kisi ki jageer hai kya? Sabka samaan adhikaar hai. Amit Shah ji, Narendra Modi ji aap khud ghuspetiye hain. Ghar aapka Gujarat agaye Dilli, aap khud migrant hain. pic.twitter.com/zrCaSfPF7v
— ANI (@ANI) December 1, 2019
एनआरसीच्या मुद्द्यावरून बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना घुसखोर म्हणून संबोधले आहे. ‘हा देश सर्वांचा आहे. हा देश कुण्या एकट्या व्यक्तिच्या मालकीचा नाही. इथे सर्वांना समान अधिकार आहे,’ असं सांगतानाच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही घुसखोर आहेत. तुमचं घर गुजरातमध्ये आहे आणि तुम्ही दिल्लीत आला आहात. तुम्ही स्वत: स्थलांतरीत आहात, वैध – अवैध या गोष्टीनंतर पाहू, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामनंतर संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर मीडियाशी संवाद साधताना अधीर रंजन चौधरी यांनी ही टीका केली. ते पुढे म्हणाले कि , मुसलमानांना पळवून लावू हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. पण मुसलमानांना पळवून लावण्याची त्यांची हिंमत नाही. मुसलमान या देशातील नागरिक आहेत. ते का म्हणून पळून जातील? हा देश सर्वांचा आहे. या देशातील हिंदू-मुस्लिम सर्व समान आहेत. सर्वांच्या सहकार्याने आणि त्यागाने हा देश बनला आहे. पण त्यांना आम्ही या देशात हिंदूंनाच ठेवू आणि मुस्लिमांना पळवून लावू हे दाखवून द्यायचे आहे.
लोकांकडे सर्वच कागदपत्रे नसतात. हा आपला देश आहे, आपण नियमित मतदान करतो, मग कागदपत्रांची गरज काय? असं जनतेचं साधंसरळ गणित असतं. एनआरसीचं एवढं वातावरण करण्यात आलं आहे की, आपलं काय होणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे. गरीब, आदिवासी, अशिक्षित आणि मागास लोक आहेत, त्यांच्याकडे शिक्षण नाही. त्यांच्याकडे कसली आलीत कागदपत्रे? आजचा दिवस कसा जाईल? दोनवेळंचं अन्न कसं मिळवता येईल, याची त्यांना भ्रांत असते. ते लोकही आज भयभीत झाले आहेत, असंही ते म्हणाले.