‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ ला संभाजी ब्रिगेडचा विरोध

‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातील दृश्ये हि अन ऐतिहासिक असून त्यातील एका प्रसंगातून साधू छञपती शिवाजी महाराज यांना क॔मडल फेकून मारतो हे दृष्य अतिशय संतापजनक व अन ऐतिहासिक आहे यामुळे छञपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हनन केले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
याबाबत संभाजी बिंग्रेड चित्रपट आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश धिंङले यांनी म्हटले आहे कि , महाराष्ट्राच्या अस्मितेवर घातलेला घाला आहे. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. छञपती शिवाजी महाराज हे निधर्मी व मानवतावादी राजे म्हणून ओळखले जातात त्यांनी त्यांच्या स्वराज्यात अठरापगड जाती धर्माची लोकं मावळा या उपाधी खाली एकञ करून रयतेचे राज्य निर्माण केले त्यांना गोब्राम्हण प्रतिपालक हे विशेषण जातीवादी आहे छञपती शिवराय हे बहूजन प्रतिपालक होते.
लेखक आणि दिग्दर्शक व निर्मिता यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास न करता अशा प्रकारे चित्रपट बनवला आहे ज्यामुळे शिवरायांच्या प्रेमी मध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. जर तानाजी या चित्रपटातील वादग्रस्त प्रंसग व संवाद वगळले नाहीत तर चिञपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही व संबंधितावर संभाजी बिंग्रेड कायदेशीर कारवाई करेल असा इशारा देण्यात आला आहे.