Aurangabad News Update : सातबारावर फेर होत नसल्याने शेतक-याची आत्महत्या

औरंंंगाबाद : शेतीच्या सातबा-यावर फेर होत नसल्याने ३२ वर्षीय तरूण शेतक-याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना करमाड परिसरातील मलकापूर शिवारात सोमवारी (दि.१८) रात्री घडली. संतोष रामचंद्र जाधव (वय ३२, रा.हर्सुल) असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संतोष जाधव याची करमाड परिसरातील मलकापूर शिवारात शेती आहे. शेतीच्या सातबारा उता-यावर फेर मिळावा यासाठी जाधव याने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. परंतु सातबा-यावर फेर होत नसल्याने गेल्या काही दिवसापासून संतोष जाधव हा मानसिक तणावात आला होता. सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास मलकापुर शिवारातील लिंबाच्या झाडाला संतोष जाधवने सुती दोरीने बांधुन गळफास घेतला.
हा प्रकार संतोष जाधव याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संतोष जाधवला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.