Current News Update : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट उद्या निकाल, पंतप्रधानांचे शांतता आणि सुव्यवस्थेचे आवाहन

Supreme Court to deliver verdict on Ayodhya matter tomorrow. pic.twitter.com/mfb3hzTNSq
— ANI (@ANI) November 8, 2019
देशातील बहुचर्चित अयोध्या प्रकरणावर उद्या (दि.९) सुप्रीम कोर्ट निकाल सुनावणार आहे. यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. उद्या सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सुरू होणार आहे. दरम्यान, अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आधीच देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. तर अयोध्येलाही पोलीस छावणीचे रूप आलेले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाच्या बाबतीत जो निकाल येईल त्याचा स्वीकार करून देशात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखावी आणि एकटा व अखंडतेचे दर्शन घडवावे असे आवाहन देशातील नागरिकांना केले आहे.
PM tweets, "Whatever decision SC delivers in #Ayodhya case, it'll not be a victory or defeat of anyone. My appeal to the countrymen is that it should be the priority of all of us that this decision should further strengthen the great tradition of peace,unity&goodwill of India. pic.twitter.com/nGXKyfraO6
— ANI (@ANI) November 8, 2019
दरम्यान उत्तर प्रदेशात दि . ९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान शाळा , महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सुरक्षेचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी राज्यात मोठा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील वाराणासी, प्रयागराज, आग्रा, मेरठ, लखनऊ, मथुरा, मुरादाबाद, गोरखपूर आणि अलीगडसहित सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून संवेदनशील विभागात मोठा बंदोबस्त वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Uttar Pradesh: All schools, colleges, educational institutions and training centres to remain closed from 9th November to 11th November. pic.twitter.com/MVYuvF8IZJ
— ANI (@ANI) November 8, 2019