Pakistan Air Strike : तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज

सीमेजवळ रणगाडे-तोफा तैनात! लष्कर, नौदल, हवाई दल पूर्णपणे सज्ज
इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील बालकोट सेक्टरमध्ये केलेला हवाई हल्ला त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत केलेली घुसखोरी या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडियन एअरफोर्स हाय अलर्टवर आहे. पाकिस्तानने कुठलीही आगळीक केली तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एअर फोर्सची फायटर विमाने अवघ्या दोन मिनिटात आकाशात झेप घेतील. हिंदुस्थान टाइम्सने हवाई दलातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
उत्तर भारतातील विमानसेवा पुन्हा सुरू
पाकिस्तानी लढाऊ विमानं आज सकाळी भारतीय हद्दीत घुसल्यानंतर बंद करण्यात आलेली उत्तर भारतातील नऊ विमानतळं पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही पुन्हा सुरू झाली आहे. भारतातील विमानसेवा पुन्हा सुरू झाली असली तरी पाकिस्तानमधील विमानसेवा मात्र बंदच आहे. दिल्लीहून येणाऱ्या सर्व विमानांना परत पाठवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोठी विमानतळं आणि देशांतर्गत हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहेत.
1. बेपत्ता पायलट सुखरुप परत येईल; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विश्वास
2. एकदा युद्धाला सुरुवात झाली, तर मी किंवा नरेंद्र मोदींच्या हातात काही राहणार नाहीः इम्रान खान
3. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगण्याची आवश्यकता; पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन
4. भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात, एकावर उपचार सुरू : पाकिस्तान लष्करचा दावा
5. भारत आणि पाकिस्ताननं शांततापूर्ण मार्गाने, चर्चा करून प्रश्न सोडवायला हवाः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं आवाहन
6. पाकिस्तानचे डेप्युटी उच्चायुक्त सैय्यद हैदर शाह यांना परराष्ट्र मंत्रालयाने समन्स बजावले
7. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधाबाबत नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून चिंता व्यक्त
8. आमचा एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे, मात्र याची खातरजमा करण्यात येत आहे- रवीश कुमार.
9. भारतीय हवाई दलाचा एक पायलट परतला नाही; रवीश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती.
10. नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न निष्प्रभ केला, याच प्रयत्नांत आम्ही पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले; रवीश कुमार यांची माहिती.
11. राजस्थान: जैसलमेर विमानतळ वाहतुकीसाठी बंद, सर्व प्रवासी वाहतूक बंद
12. जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर सैन्याची नियुक्ती
13. दिल्लीहून उत्तर भारतात जाणारी ६० विमानांचे उड्डाण रद्द
14. दिल्ली: २७०० कोटींच्या संरक्षण साम्रगी खरेदीला मंजुरी
15. नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रम अर्धवट सोडला; कार्यक्रम सुरू असताना चिठ्ठी मिळाल्याने बैठकीसाठी पंतप्रधान रवाना