Aurangabad Crime : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन बायकोचा गळा दाबून खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
Advertisements
Advertisements
औरंगाबाद – खाजगी वाहन चालक असणार्या इसमाने सोमवारी पहाटे १.३०च्या सुमारास अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबून खून केला व स्वता: फीनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी एम.वाळूज पोलिस ठाण्यात पती विरोधात खूनाचा गून्हा दाखल झाला आहे.
रेखा गायके(२४) असे मयत विवाहितेचे नाव असून तिचा पती अण्णा गायके याने गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.दरम्यान आरोपी अाण्णा गायके ने फिनेल पिल्यामूळे घाटी रुग्णालयात त्याच्यावर पोलिस बंदोबस्तात उपचार सुरु असून मंगळवारी त्यास अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.पुढील तपास पीएसआय चासकर करंत आहेत.
Advertisements
