Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : वाटण्यावरुन चोरट्यांचे भांडणे,एकाचा गळा चिरला, दोन अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद -रविवारी रात्रीसुतगिरणी चौकातील गुरुकृपा फरसाण मार्ट फोडून ९ हजार ५००रु. रोकड लांबवल्यावर त्याच्या वाटणीवरुन सोमवारी पहाटे २ च्या सुमारास सुतगिरणीच्या ओसाड मैदानावर रेकाॅर्डवरील चोरट्याचा चाकूने गळा त्याच्या साथीदारांनी चिरल्यानंतर जवाहर नगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करंत दोघांना अटक केली आहे.
राजेश जनार्दन येडे(२१) रा.इंदीरानगर, इम्रान बेग अमीर बेग(२५) रा.काबरानगर या दोघांना खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.यांचे दोन साथीदार फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.वरील दोघांनी रेकाॅर्डवरील आरोपी शेख माजीद गुलाब शेख(१८) रा. काबरानगर याचा गळा चिरुन खून करण्याचा प्रयत्न केला. शेख माजीदवर जवळपास १५घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.तर गुरुकृपा फरसाण मार्ट फोडणार्‍या प्रकरणात शेख माजीद,त्याचे दोन रेकाॅर्डवरील साथीदार शेख अफरोजउर्फ राज(१९),शेख अली शेख सत्तार पठाण(१९) व अन्य दोघे अशा चौघांचा सहभाग होता. माजीद चा गळा चिरल्यानंतर अफरोज आणि अली ने माजीद ला घाटी रुग्णालयात नेले.वरील प्रकरणात घरफोडीचाही गुन्हा दाखल झाला आहे.वरील प्रकरणाचा तपास एपीआय श्रध्दा वायदंडे यांच्या समवेत पीएसआय तायडे आणि हवालदार बोराडे करंत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!