Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

घरासमोर लघुशंका करू नको सांगणे बेतले जीवावर , संतप्त तरुणाचा दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला , पती ठार , पत्नी जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

घरासमोर लघुशंका करू नकोस, असे सांगणाऱ्या एका दाम्पत्यावर खुनी हल्ला झाला. त्यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मुंबईतील गोरेगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. अमित श्रीवास्तव असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदलाल रामदेव कनोजिया (४५) आणि उर्मिला नंदलाल कनोजिया हे दाम्पत्य गोरेगाव बाबासिंग चाळीत राहतात. आरोपी अमित श्रीवास्तव गुरुवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी त्यांच्या घरासमोर लघुशंका करत होता. कनोजिया दाम्पत्याने त्याला हटकले. यावरुन कनोजिया आणि आरोपीमध्ये बाचाबाची झाली. कनोजिया यांनी आरोपीविरूद्ध मालाड पोलिसांत तक्रार दिली. यामुळे संतापलेल्या आरोपी अमितने मित्राला बोलावले. दोघांनी कनोजिया दाम्पत्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात नंदलाल कनोजिया यांचा जागेवरच मृत्यू झाला तर उर्मिला या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी अमित श्रीवास्तव याला अटक केली असून त्याच्या विरोधात ३०२ आणि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!