Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुस्लिमांनो जास्तीत जास्त मुले जन्माला घाला , मुस्लिम नेते बदरुद्दीन अजमल यांचा मुस्लिमांना सल्ला !!

Advertisements
Advertisements
Spread the love

थिरुवअनंतपुरम मधील  ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआईयूडीएफ) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे कि ,  नरेंद्र मोदी यांचे सरकार संघाच्या इशाऱ्यावर चालत असून एकीकडे मोदी भारतीयांना दोनच मुले जन्माला घालण्याचा सल्ला देतात तर त्यांचे मार्गदर्शक असलेले संघ प्रमुख मोहन भागवत हिंदूंना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला देतात त्यामुळे मुसलमानांनीही जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे असा सल्ला दिला आहे .

Advertisements

यासंदर्भात बोलताना अजमल यांनी म्हटले आहे कि , मुस्लिमांना नोकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाही आणि सरकारकडून त्यांना याबाबत तशी आशाही नाही. त्यामुळे मी माझ्या लोकांना सांगेन कि त्यांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा. आमच्याकडून कुठलाही प्रतिबंध नाही. तसेही सरकार मुस्लिमांना कुठल्याही नोकऱ्यांमध्ये संधी देत नाही. आणि त्यांच्याकडून आम्हाला कुठलीही आशाही नाही. याउलट मुस्लिमांनी अधिकाधिक मुलांना जन्म द्यावा , त्यांना चांगले शिक्षण द्यावे , शिक्षित करावे म्हणजे ते स्वतः रोजगार उपलब्ध करतील आणि हिंदू लोकांनाही रोजगाराच्या संधी निर्माण करून देतील.

Advertisements
Advertisements

संघाच्या नीतीवर बोलताना ते म्हणाले कि , एकीकडे संघप्रमुख हिंदूंना ८ ते १० मुले जन्माला घालण्याचा जाहीर  सल्ला देतात तर दुसरीकडे सरकार दोन हुन अधिक मुले असलेल्यांना  शासकीय नोकऱ्या मिळणार नाहीत असे जाहीर करीत करीत आहे. त्यामुळे त्यांनी ठरविले पाहिजे कि त्यांना नेमके काय हवे आहे ?

आपलं सरकार

Click to listen highlighted text!