Mohan Bhagvat : शहिदांच्या तेराव्या दिवशी पाकिस्तानला अद्दल घडवली

देशभर भारतीय वायू दलाचे कौतुक केले जात असून या कारवाईवर बोलताना , पुलवामा येथे जे जवान शहीद झाले त्याला तेरा दिवस उलटले. त्यादिवशीच सरकारने पाकिस्तानला चांगली अद्दल घडवली अशी प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. १४ फेब्रुवारीच्या दिवशी जम्मूतील पुलवामा या ठिकाणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाचे चाळीस जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. त्यानंतर आज पहाटे वायुदलाने जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करून पाकिस्तानला हादरा दिला. या हवाई हल्ल्याचे देशभरात कौतुक होते आहे. मोहन भागवत यांनी नागपुरात बोलताना सरकारने योग्यच कारवाई केल्याचं म्हटलं आहे.