आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तिहार कारागृहात पोहोचल्या …

Delhi: Congress interim President Sonia Gandhi arrives at Tihar Jail to meet Congress leader DK Shivakumar, who is currently lodged in the jail under judicial custody in connection with a money laundering case. pic.twitter.com/M3mtlxXmZZ
— ANI (@ANI) October 23, 2019
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री डीके शिवकुमार यांची आज तिहार कारागृहात जाऊन त्यांची भेट घेतली. मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने शिवकुमार यांना अटक केल्यापासून ते तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास तिहार कारागृहात पोहोचल्या आणि त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवकुमार यांची आज सकाळी तिहार कारागृहात जाऊन डीके यांची भेट घेतली . डीके शिवकुमार यांना ईडीने काही आठवड्यापूर्वी अटक केली होती. डीके सध्या तिहार कारागृहात बंद आहेत. सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच आयएनएक्स मीडिया प्रकरणात आरोप असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचीही तिहार कारागृहात जाऊन भेट घेतली होती. यावेळी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या सोनिया गांधी यांच्यासोबत चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम हेही उपस्थित होते.
डीके शिवकुमार यांना अटक केल्यापासून ते तिहार कारागृहात बंदीस्त आहेत. त्यांच्या जामीन याचिकेवर बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. न्यायाधीश सुरेश कैत यांनी डीकेंच्या जामीन याचिकेवरचा निर्णय १७ ऑक्टोबर रोजी राखून ठेवला होता. याचिकेत दावा करण्यात आला होता, की हे प्रकरण राजकीय सूडापोटी करण्यात आले आहे. या विरोधात पुरेसे पुरावे नाहीत, असे डीकेंच्या वकीलाने कोर्टात युक्तीवाद केला होता. ईडीने जामिनाला विरोध करताना म्हटले की, डीके हे प्रभावशाली व्यक्ती आहेत. जर त्यांना जामीन देऊन सोडण्यात आले तर ते पुराव्यासोबत छेडछाड करू शकतात. पुरावा मिटवू शकतात तसेच साक्षीदारांना धमकी देऊन आपल्या बाजुने करू शकतात, असे ईडीने म्हटले होते.