Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अंतर्वस्त्रातून एक कोटीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या हवाई सुंदरीला अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

अंतर्वस्त्रातून एक कोटीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या हवाई सुंदरीला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. ती दुबईतून मुंबईत आली होती. आरोपी हवाई सुंदरी ही दुबईहून आली होती. तिच्याजवळ बॅग होती. त्यात ठेवलेल्या अंतर्वस्त्रात चार किलो सोने लपवले होते.

Advertisements

मुंबई विमानतळावर तिला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून एक खासगी विमान शनिवारी मुंबई विमानतळावर उतरले होते. त्यात असलेल्या हवाई सुंदरीनं बॅगमध्ये सोने लपवले होते. ही तस्कर असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. तिला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. तिच्याजवळील बॅगेची झाडाझडती घेतली. त्याचवेळी बॅगमध्ये ठेवलेल्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवलेले सोने आढळून आले. तिला लगेच अटक करण्यात आली. चार किलो सोने जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत अंदाजे एक कोटी रुपये आहे.

Advertisements
Advertisements

अधिकाऱ्यांनी विमानतळावर संशयावरून ताब्यात घेतलेल्या हवाई सुंदरीकडे चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. दुबईतील एका व्यक्तीनं तिला सोने तस्करीसाठी ६० हजार रुपये देण्यात येतील असे सांगितले होते. चौकशीदरम्यान तिनं ही माहिती अधिकाऱ्यांना दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!