Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : शरद पवार यांचेही डोके एक रुपयात तपासून देऊ , उद्धव ठाकरे यांची टीका

Advertisements
Advertisements
Spread the love

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आपल्या सभेत घणाघाती टीका करताना भाष्य केले कि , शिवसेनेने वचननाम्यात १ रुपयात आरोग्य तपासणीची घोषणा केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार त्यावरही टीका करत आहेत. त्यांची हि टीका हा निव्वळ विघ्नसंतोषीपणा आहे, आवश्यकता भासत असेल तर आम्ही १ रुपयात तुमचंही डोकं तपासून देऊ असा खोचक टोला  शरद पवार यांना लगावला. उस्मानाबादमध्ये झालेल्या सभेत बोलताना त्यांनी हि टीका केली.

Advertisements

महायुतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची उस्मानाबादमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका केली. १० रुपयात थाळी या शिवसेनेच्या घोषणेनंतर शरद पवार यांनी टीपण्णी केली होती. तुमच्या काळात तुम्ही गोरगरीबांच्या जेवणाची सोय केली नाहीत आता आम्ही करतो आहोत तर आमच्या वाटेत खड्यासारखे येऊ नका असेही उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना सुनावले. झुणका भाकरी केंद्रांची योजना चांगलीच होती. करंटे सरकार सत्तेवर आले आणि ही योजना बंद पाडली असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. सामान्य माणसाचे पोट न भरता आघाडीच्या काळात नेत्यांची त्यांचे खिसे भरले अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Advertisements
Advertisements

याचवेळी अजित पवार यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. बाळासाहेबांना अटक करणं ही आमची चूक होती असं अजित पवार सांगतात. तुमच्या विमानाचे पायलट शरद पवार काय करत होते? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!