ब्लॅकमेलिंगला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील वांकानेरमधील पेडक सोसायटीत ग्रुप सेक्ससाठी ब्लॅकमेल केल्याने एका २० वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आलीय. गुरुवारी सकाळी पीडित मुलीने स्वतःला पेटवून घेतलं होतं. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्याच दिवशी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.
मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपींची ओळख पटलीय. जितेंद्र मकवाणा, राहुल व्होरा, अखिल परमार आणि गौरी उभाडिया अशी आरोपींची नावं आहेत. जितेंद्रने आपल्यासोबत किसिंग करतानाचा व्हिडिओ चोरून काढला. या व्हिडिओवरून दुसऱ्या आरोपींनी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तसंच आपल्यासोबत ग्रुप सेक्स करण्याची मागणी केली. तर या प्रकरणात गौरीने आरोपींना मदत केली, असं आत्महत्येपूर्वी मुलीने सुसाइड नोटमध्ये लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी या प्रकरणी राहुल आणि गौरीला अटक केलीय. तर फरार इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पीडित मुलगी ही १२वी विद्यार्थींनी होती. वांकानेरमधील मुलींच्या शाळेत ती शिकत होती. तिची आई मजुरी करते. तर वडील बिगारी काम करतात.