महात्मा गांधी आज असते तर ते संघात असते , भाजप खासदार राकेश सिन्हा

महात्मा गांधी आज असते तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असते, असं तर्कट व्यक्त करतानाच संघामध्येच गांधी विचाराचे सर्वाधिक अनुयायी असल्याचा दावा भाजपचे राज्यसभा सदस्य राकेश सिन्हा यांनी केला.
गांधींजींचे फोटो आणि त्यांच्या नावाचा वापर करणारे लोक आज गांधी विचारांच्या विरोधात आहेत, अशा शब्दात राकेश सिन्हा यांनी काँग्रेसवर टीकास्त्रही सोडलं. सिन्हा हे भाजपचे खासदार असून दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापकही आहेत. आरएसएसचे अभ्यासक असलेल्या सिन्हा यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचं आत्मचरित्रं लिहिलं आहे. त्याशिवाय सिन्हा यांनी संघावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.