Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : तलाक पेपरवर सही न करणा-या पतीला मारहाण, पत्नीसह तीघांवर गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : तलाक पेपरवर सही करण्यास नकार देणा-या पतीला पत्नीसह मुलगा व अन्य एकाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सातारा परिसरात घडली. प्रकरणात मोहम्मद इब्राहीम मोहम्मद हाजी ( ४५, रा. सिल्कमील कॉलनी) यांनी तक्रार दिली.

Advertisements

तक्रारीनुसार, मोहम्मद इब्राहीम यांना पत्नीने मुलाला भेटण्यासाठी सातारा परिसरात बोलाविले होते. त्यानुसार मोहम्मद इब्राहीम गेले असता तेथे पत्नीने तलाक पेपरवर सही करण्यास सांगितले. मात्र इब्राहीम यांनी नकार दिल्याने पत्नीसह मुलगा माहेम्मद सौहाद व घरमालक शेख असद अशा तीघांनी इब्राहीम यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मारहाण करित जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवादार हिवराळे करित आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!