Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : सहप्रवाशांनी लांबविला सेवानिवृत्त शिक्षीकेचा ३ लाखांचा ऐवज

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : रिक्षात सहप्रवासी म्हणून बसलेल्या ३ जणांनी सेवानिवृत्त शिक्षीकेचे लक्ष विचलीत करून जवळपास २ लाख ९९ हजार ८३३ रूपये किमतीचा  ऐवज लंपास केला. हा प्रकार २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान रेल्वेस्टेशन ते गादीया विहार दरम्यान घडला.
मंगला वसंतराव जोशी-देशपांडे (वय ६३, रा.प्लॉट नंबर ४, मधुबन शिक्षक हौसींग सोसायटी, गादीया विहार) या २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन येथे मुंबईहुन आल्या होत्या. रेल्वेस्टेशन येथील रिक्षा स्टँड येथून त्या गादीया विहारकडे जाण्यासाठी रिक्षात बसल्या होत्या. त्यावेळी रिक्षात सहप्रवासी म्हणून बसलेल्या ३ जणांनी मंगला जोशी-देशपांडे यांचे बोलण्यात लक्ष गुंतवून ठेवत त्यांच्या बॅगमधील २ लाख ७४ हजार ८३३ रूपये किमतीचे  सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम २५ हजार असा एकूण  २ लाख ९९ हजार ८३३ रूपये विंâमतीचा ऐवज रेल्वेस्टेशन ते गादीया विहार दरम्यान काढुन घेतला.
याप्रकरणी मंगला जोशी-देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिक्षाचालकासह त्याच्या तीन साथीदाराविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सानप करीत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!